Thu, Nov 15, 2018 07:26होमपेज › Aurangabad › उच्च न्यायालयाची मुख्याधिकार्‍यांना नोटीस

उच्च न्यायालयाची मुख्याधिकार्‍यांना नोटीस

Published On: Feb 06 2018 1:43AM | Last Updated: Feb 06 2018 1:43AMबीड : प्रतिनिधी 

स्थगिती असतानाही पालिकेच्या मुख्याधिकार्‍यांनी शहरातील लक्ष्मण नगर भागातील घरांवर कारवाई केल्याप्रकरणी औरंगाबाद खंडपीठाने बीड नगर परिषदेच्या मुख्याधिकार्‍यांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणात 22 मार्च रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. 

बीड शहरातील लक्ष्मण नगर भागातील 14 घरांवर पालिका प्रशासनाने कारवाई केली होती. या प्रकरणामध्ये न्यायालयाचे स्थगिती आदेश असतानाही पालिकेच्या अधिकार्‍यांनी एका दिवसात सर्व घरे पाडल्या प्रकरणी आएशा बेगम मोहंमद अब्दुल्ला इनामदार यांनी औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या प्रकरणामध्ये उच्च न्यायालयाने नगर पालिकेच्या मुख्याधिकार्‍यांना नोटीस बजावली आहे. 22 मार्च रोजी मुख्याधिकार्‍यांना न्यायालयात हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणी अ‍ॅड.सय्यद तोसीफ यांनी याचिकाकर्त्यांची बाजू मांडली.