Fri, Dec 13, 2019 01:08होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : कन्नड तालुक्‍यात अतिवृष्‍टी 

औरंगाबाद : कन्नड तालुक्‍यात अतिवृष्‍टी 

Published On: Jul 21 2019 10:13AM | Last Updated: Jul 21 2019 10:13AM
औरंगाबाद : प्रतिनिधी 

कन्नड  तालुक्यात काल (शनिवार) सर्वदूर जोरदार पाऊस झाला. चापानेर व कन्नड मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. तालुक्यात ४५ दिवसात १३७ मि. मि इतका पाऊस झाला आहे. शनिवारी एकाच दिवसात ७८ मि मि पाऊस झाल्याने पावसाने दोनशेच्या वर सरासरी ओलंडली आहे.

तालुक्यात शिवना, गांधारी, अंजना पळशी तसेच छोटे मोठे नाल्यास पुर आल्याने पाझर तलाव, मध्यम प्रकल्प, धरणे यात पाणी साठा जमा होण्यास सुरुवात झाली आहे. या पावसामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई कमी होण्यास मदत होणार आहे. 

विविध भागात झालेल्‍या पावसाचे प्रमाण पुढीलप्रमाणे...

कन्नड - ११८ मि.मी आतापर्यंत एकूण २५६ मि.मी  
चापानेर -१४२ मि.मी आतापर्यंत एकूण २५१ मि.मी 
देवगाव -३९ मि.मी आतापर्यंत एकूण - १४१ मि.मी 
चिखलठाण -६५ मि.मी  आतापर्यंत एकूण १४१ मि.मी 
पिशोर -५९ मि.मी आतापर्यंत एकूण - २३२ मि.मी 
नाचनवेल -६९ मिमि आतापर्यंत एकूण १६२ मि मि
करजंखेड़ -६१ मि.मी  आतापर्यंत एकूण २३२ मि.मी 
चिंचोली -७१ मि.मी आतापर्यंत एकूण ३०९ मि.मी 
 २० जुलै एकूण मंडळ पाऊस - ६२४ मि.मी 
२० जुलै सरासरी पाऊस - ७८ मि.मी 

आतापर्यंत एकूण सर्व मंडळातील पावसाचे प्रमाण १७२४ मि.मी इतकी झाली आहे. शिवना नदीला पूर आल्याने नदीला पूर आल्‍याने नाचनवेल पिशोर परिसरात शेतात पाणी शिरले आहे. पिशोर ता.कन्नड येथील अंजना पळशी प्रकल्पात बऱ्या प्रमाणात पाणी जमा झाले आहे. जो प्रकल्प मागील 10 महिन्यापासून पाण्याविना कोरडा होता. त्यात पाणी येण्यास सुरुवात झाली असल्याचे पिशोरवासीयांमध्ये समाधान व्यक्‍त करण्यात येत आहे.