Tue, Apr 23, 2019 18:06होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : माणिक हॉस्पिटलला भीषण आग

औरंगाबाद : माणिक हॉस्पिटलला भीषण आग

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

औरंगाबाद: प्रतिनिधी 

येथील गरखेडा परिसरातील माणिक हॉस्पिटलला सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. हॉस्पिटलच्या खालच्या मजल्याला आग लागल्याने वरच्या मजल्यावर उपचार घेत असलेले अनेक रूग्ण अडकले होते. त्यांना बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य सुरू आहे. हॉस्पिटलमध्ये तळमजल्यात जिन्याच्या वेल्डिंगचे काम सुरु होते. त्याची ठिणगी पडल्याने आग लागली, असे काही रुग्ण सांगत आहेत.  सर्व रुग्णांना घाटी, हेडगेवार, एमजीएम रुग्णालयात हलवण्यात आले आहे. 

अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

सकाळी ११ च्या सुमारास रुग्णालयाला खालच्या मजल्यावर आग लागली होती. खाली सात रुग्ण जनरल वॉर्डमध्ये उपचार घेत होते. खालच्या मजल्यात लागलेली आग आटोक्यात आल्याने वरच्या मजल्यावर कुठेही आग लागलेली नाही. हेडगेवार, सिग्मा आणि जेजे प्लस या दवाखान्यांत ३० रुग्णांना यशस्वीपणे हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आगीत नेमके किती नुकसान झाले याचा अद्याप अंदाज नाही. मात्र यात कोणतीही जीवित हानी झाली नाही यातच समाधान आहे.
- उल्हास कोंडापल्लेे, संचालक माणिक हॉस्पिटल

Tags :  fire, manik hospital, aurangabad,  aurangabad news  


  •