Sat, Sep 22, 2018 08:44होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : हर्सूल सावंगी येथे कचरा टाकण्यास विरोध

हर्सूल सावंगी येथे कचरा टाकण्यास विरोध

Published On: Apr 28 2018 12:43PM | Last Updated: Apr 28 2018 12:43PMऔरंगाबाद : प्रतिनिधी

हर्सूल सावंगी येथे कचरा टाकण्यासाठी आलेल्या गाड्या शनिवारी स्थानिक रहिवाशांनी रोखल्या. यावेळी मनपा अधिकारी आणि  कर्मचाऱ्यांना स्थानिक नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागला. त्यामुळे कचरा न टाकताच गाड्या माघारी फिरल्या. नारेगाववासीयांच्या विरोधानंतर तेथील कचरा डेपो बंद झाला आहे. त्यानंतर तब्बल ७२ दिवसांपासून शहराची कचराकोंडी झालेली आहे.

ही कोंडी फोडण्यासाठी महापालिका प्रशासनाने कचर्‍यांची शास्त्रीय पध्दतीने विल्हेवाट लावण्यासाठी चार जागा निश्चित केल्या आहेत त्यापैकीच एक हर्सूल सावंगी येथे शनिवारी सकाळी कचरा टाकण्यासाठी मनपाच्या ४ ते ५ गाड्या गेल्या होत्या. मात्र यावेळी जमलेल्या स्थानिक रहिवासी आणि नागरिकांच्या जमावाने तीथे कचरा टाकण्यास प्रचंड विरोध सुरू केला.

मनपा सहायक आयुक्त मांडूरगे यांनी समजावण्याचा प्रयत्न केला परंतु  जमावाने त्यांचे काहीही ऐकले नाही. शेवटी नागरिकांच्या प्रचंड  विरोधामुळे आलेल्या गाड्या तशाच माघारी फिरल्या.