Sun, Feb 23, 2020 09:24होमपेज › Aurangabad › आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या अटकेचा औरंगाबादमध्ये निषेध

आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या अटकेचा औरंगाबादमध्ये निषेध

Published On: Jul 30 2018 9:38PM | Last Updated: Jul 30 2018 9:37PMकन्नड : प्रतिनिधी

मराठा आरक्षण आंदोलनासाठी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी शांततेच्या व लोकशाही मार्गाने मुंबई येथील मंत्रालयजवळ गांधी पुतळ्याजवळ ठिय्या आंदोलन केले. यावेळी त्यांना पोलिसांनी केलेल्या अटकेच्या कारवाईच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी निवेदन देवून निषेध व्यक्त केला आहे. 

मराठा आरक्षण आंदोलनासाठी राज्यात आमदार पदाचा राजीनामा जाधव यांनी दिला असून औरंगबाद येथे जिल्हाधिकारी कार्यालय तसेच क्रांती चौक येथे शांततेत लोकशाही मार्गाने आंदोलन केले. आंदोलकावरील गुन्हे मागे घेण्यासाठी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून केलेले आंदोलन शांततेत हातळून कार्यककर्त्यांना माघार घेण्यासाठी मोठी मध्यस्थी केली. यामुळे मोठी हानी टळली आहे. मराठा आरक्षणासाठी अध्यादेश काढा या मागणीसाठी मुंबई मंत्रालयजवळ गांधी पुतळ्याजवळ आमदार जाधव ठिय्या आंदोलन करत आसताना त्यांना पोलिसांनी अटक केल्याने तालुक्यातील जनतेत असंतोष निर्माण झाला आहे. सरकारला यांची किंमत चुकावावी लागेल, या घटनेचा निषेध करून तात्काळ आमदार जाधव यांच्यावरील राजकीय सूड बुध्दीने केलेली कारवाई थांबवावी अशी मागणी सभापती राजेंद्र मगर, शेरोड़ी सरपंच जयेश बोरसे, जेहूर सरपंच ज्ञानेश्वर निकम, प्रदीप बोडखे, रमेश धनकर, सोपान शिरसाठ, संदीप चव्हाण, श्रीराम घुगे, आदींसह निवेदन देण्यात आले.