Fri, Apr 26, 2019 09:25होमपेज › Aurangabad › नातवांनी अनुभवला आजोबांचा लग्नसोहळा

नातवांनी अनुभवला आजोबांचा लग्नसोहळा

Published On: Jan 14 2018 1:51AM | Last Updated: Jan 14 2018 12:12AM

बुकमार्क करा
औरंगाबाद :  प्रतिनिधी

प्रगतिशील ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संस्था, सिडको येथे सभासदांचा अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण सोहळा व वैवाहिक जीवनाला पन्नास वर्षे पूर्ण झालेल्या सभासद जोडप्यांचा सुवर्ण महोत्सवी सत्कार संस्थेतर्फे  करण्यात आला. संस्थेने आगळ्यावेगळ्या पद्धतीने 50 वर्षांपूर्वीची विवाहस्थिती निर्माण केली. तीच सुखद लज्जा आणि सावधानाची मनात धडकी पती व पत्नीच्या चेहर्‍यावर दिसत होती. नातवांनी आनंदाने टाळ्या वाजवून हा कौतुक सोहळा अनुभवला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष आर. पी. दुसे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून उद्योगपती अथासिंग पी. व त्यांच्या पत्नी, माधव बागचे मानस डांगे, संस्थेच्या उपाध्यक्षा सुवर्णलता शर्मा यांची उपस्थिती होती. कार्यक्रमात अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केलेल्या संस्थेतील सदस्यांचे तसेच 50 वर्षे वैवाहिक जीवन यशस्वी पार पडलेल्या सदस्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केलेल्यांमध्ये आर. पी. दुसे, श्रीकिशन शर्मा, अरुण लुब्धे, डॉ. अमरसिंह ठाकूर, महेंद्रकुमार जैन, आशाताई कुलकर्णी, श्रीनिवास धूत, लक्ष्मीकांत कुलकर्णी, प्रा. रमेश कुलकर्णी, केशव कुलकर्णी, अरविंद कापुरे, मुक्‍ताबाई खोत, दादाराव काचोळे यांचा सत्कार करण्यात आला. 50 वर्षे वैवाहिक जीवन यशस्वीपणे पार पडलेल्या मनोहर सोनुने, कमलाकर जोशी, रमेश मुळे, रमणलाल गुजर, महेंद्रकुमार जैन, प्र. शं. पांडे, दिवाकर पाटील यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. 

बाबूराव दुधगावकर यांच्या बासरीवादनाने आणि रामदास जोशी व सहकार्‍यांच्या स्वागतगीताने कार्यक्रमात चैतन्य आणले.