Wed, Feb 20, 2019 06:30होमपेज › Aurangabad › प्रेयसीचा लग्नासाठी तगादा;  तरुणाची आत्महत्या

प्रेयसीचा लग्नासाठी तगादा;  तरुणाची आत्महत्या

Published On: Aug 09 2018 1:35AM | Last Updated: Aug 09 2018 1:35AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

लग्नासाठी प्रेयसीने तगादा लावल्याने तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी स्वामी समर्थ चौकाजवळील इंद्रप्रस्थ कॉलनीत उघडकीस आली. विशाल वसंतराव जाधव (23, रा. शिवाजीनगर, परभणी, ह. मु. इंद्रप्रस्थ कॉलनी, गारखेडा) असे आत्महत्या करणार्‍या तरुणाचे नाव आहे.

विशाल जाधव हा चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीत कामाला होता. त्यामुळे जवळच असलेल्या गारखेड्यातील इंद्रप्रस्थ कॉलनीत तो मित्रांसोबत बोबडे यांच्या घरात भाड्याने राहत होता. मंगळवारी घरात कोणी नसताना त्याने छताच्या लोखंडी  अँगलला स्कार्फने गळफास शी हा कामावरून परत आला. त्याने रूमचा दरवाजा ठोठावला. मात्र आतून प्रतिसाद येत नसल्याने विशाल झोपला असल्याचे समजून तो मित्राच्या  रूमवर जाऊन झोपला. सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास परत आल्यानंतरही विशाल आतून काही प्रतिसाद देत नसल्याने त्याने ही बाब घरमालकास सांगितली. त्यांनी पुंडलिकनगर पोलिसांना बोलविल्यानंतर दरवाजा तोडला असता विशालने गळफास घेतल्याचे समोर आले. पोलिसांनी त्याला तत्काळ घाटीत आणले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस हवालदार सुखदेव कावरे हे तपास करत आहेत.

प्रेमप्रकरणातून घडली घटना विशाल जाधव याचे एका तरुणीबरोबर प्रेमसंबंध होते. त्यामुळे काही दिवसांपासून या तरुणीने विशालमागे लग्नासाठी तगादा लावला होता. मात्र, विशालने तिला आताच लग्न नको म्हटले होते. त्यावरून विशाल टाळत असल्याचे वाटल्याने ही तरुणी त्याच्यावर दबाव आणत होती. त्यामुळे विशाल हा काही दिवसांपासून तणावात होता. त्यातूनच त्याने आत्महत्या केल्याचे त्याच्या मित्रांनी सांगितले.

कोणाची तक्रार नाही

विशाल जाधव याने मुलीसोबत असलेल्या प्रेमप्रकरणातून आत्महत्या केली आहे, मात्र त्याच्या वडील आणि भावाचा जबाब घेतला. त्या दोघांनी मुलीची तक्रार देण्याचे टाळले. मात्र, या प्रकरणी गुरुवारी घरमालकाचा जबाब घेणार असल्याचे तपास अधिकारी पोलिस हवालदार सुखदेव कावरे यांनी सांगितले.