Tue, Jul 23, 2019 10:27होमपेज › Aurangabad › पैसे संपल्याने मृतदेह चार तास रूग्णालयासमोर

पैसे संपल्याने मृतदेह चार तास रूग्णालयासमोर

Published On: Feb 22 2018 11:06AM | Last Updated: Feb 22 2018 10:36AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

घाटीतच जन्मलेल्या 9 दिवसीय चिमुरडीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.  सोबत आणलेले थोडेफार पैसे संपून गेले. गावी जायचे तर पैसेच नसल्याने एक कुटुंब  जवळपास चार तास चिमुरडीचा मृतदेह घेऊन घाटीसमोर बसून होते. के. के. ग्रुपला ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी त्यांना बसभाडे देऊन गावी पोहचविण्यास  मदत केली. 

देऊळगाव राजा जिल्हा बुलडाणा  येथील खंडू निकाळजे यांनी मुलीला डिलेव्हरीत गुंतागुंत उद्भवल्याने घाटीत दाखल केले होते. नऊ दिवसांपूर्वी त्यांच्या मुलीने  एका गोंडस बालिकेला जन्म दिला. मात्र, वजन कमी तसेच प्रकृती ठीक नसल्याने नऊ दिवसांतच चिमुरडीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे निकाळजे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांनी जे काही पैसे  सोबत आणले होते, ते नऊ दिवसांत पूर्ण खर्च झाले. चिमुरडीचा मृतदेह घरी न्यायचा तर खिशात एक रुपयाही नव्हता. यामुळे सुटी घेऊन खंडू निकाळजे त्यांची पत्नी, मुलगी व जावई असे पाच जण घाटीतील अपघात विभागासमोर बुधवारी  (दि. 21)  सकाळी 9 वाजेपासून बसून राहिले होते.

एमएसएफच्या सुरक्षा रक्षकांची त्यांच्यावर नजर गेली. इतक्या वेळापासून तुम्ही का बसून आहात अशी विचारणा केल्यानंतर  त्यांनी सर्व हकिकत सांगितली. यानंतर सुरक्षा रक्षकाने इन्चार्ज जैस्वाल यांना ही माहिती दिली. जैस्वाल यांनी समाजसेवी संघटना के. के. गु्रपचे हाफीज साहेब ऊर्फ  अकिल अहेमद व  किशोर वाघमारे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी तत्काळ धाव घेत त्यांना देऊळगाव राजाला जाण्यासाठी बसभाडे दिले.