होमपेज › Aurangabad › फेसबुकवर जुळले; मोबाइलमुळे उघडे पडले 

फेसबुकवर जुळले; मोबाइलमुळे उघडे पडले 

Published On: Mar 12 2018 10:47AM | Last Updated: Mar 12 2018 10:46AMवाळूज महानगर : प्रतिनिधी

फेसबुकवर झालेल्या मैत्रीनतंर दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानतंर तो तिला भेटण्यासाठी दुचाकी घेऊन चक्क चिखली येथे गेला. तेव्हाच या दुचाकी घेऊन आलेल्या प्रियकराला चल, असे म्हणत  त्याच्यासोबत प्रेयसीही दुचाकीवरून थेट बजाजनगरात आली. मात्र घरच्यांनी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार चिखली ठाण्यात दिली. ते दोघे मोबाइलच्या लोकेशनमुळे पोलिसांच्या हाती लागले.  

या  विषयी अधिक माहिती अशी की, बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथील रुपालीची (18, नाव बदलेले आहे) फेसबुकवर सहा महिन्यांपूर्वी बजाजनगरात राहणार्‍या सतरा वर्षीय विवेकसोबत (नाव बदलले  आहे) मैत्री झाली होती. फेसबुकवर चॅटिंग करता-करता ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. यामुळे विवेक ही अधूनमधून बुलडाणा येथे जाऊन तिला भेटत असे. दरम्यान, दोघांनी सोबत राहण्याचा निर्णय  घेतल्याने विवेक हा दुचाकीवरून चिखली  येथे गेला होता. शनिवारी तेथून दुचाकीवरुन ते दोघे सरळ बजाजनगरात दाखल झाले. मुलगी उशिरापर्यंत घरी न आल्यामुळे घरच्यांनी रुपालीचा शोध  सुरू केला. मोबाईल लोकेशनद्वारे रूपाली ही बजाजनगरात असल्याचे समोर आले. 

चिखली पोलिसांनी वाळूज ठाण्याला माहिती दिली. याविषयी एमआयडीसी वाळूज ठाण्याचे कॉन्स्टेबल बाबासाहेब  काकडे, देविदास इंदोरे, शैलेंद्र आयडियाल, विशेष पोलिस अधिकारी अंबादास प्रधान यांना माहिती मिळाल्याने त्यांनी मोबाइल लोकेशनच्या आधारे परिसरातील लॉज, हॉटेल आदी ठिकाणी त्यांचा शोध  घेतला. तसेच यासाठी अरविंद चौधरी, शेख अस्लम, शिलानंद ससाणे यांची मदत घेऊन दोघांना रविवारी सकाळी शोधून काढले. दुपारी मुलीचे आई-  वडील तसेच चिखली पोलिस आल्याने मुलीला त्यांच्या स्वाधीन केले.

बजाजनगरात मित्राच्या खोलीवर राहिले रूपालीच्या एका मैत्रिणीने रूपाली ही एका मुलाच्या दुचाकीवर बसून गेल्याचे त्यांना सांगितले. यामुळे मुलीच्या आईने चिखली पोलिस ठाण्यात मुलगी बेपत्ता  झाल्याची तक्रार दिली. बजाजनगरात आणल्यावर विवेकने मुलीला स्वत:च्या घरी न घेऊन जाता एका मित्राच्या खोलीवर नेले होते.