Wed, Nov 14, 2018 03:52होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : कन्‍नड तालुक्यात ६ लाखाचा मका जळून खाक

औरंगाबाद : कन्‍नड तालुक्यात ६ लाखाचा मका जळून खाक

Published On: Mar 03 2018 6:11PM | Last Updated: Mar 03 2018 6:11PMऔरंगाबाद : प्रतिनिधी

कन्नड तालुक्यातील नागापूर शिवारातील व करजखेड तलाठी सजा अंतर्गत येणाऱ्या रामसिंग सरदारसिंग  गौर व गणेश रामसिंग गौर या शेतकऱ्याची ११ एकरवर ठेवलेली पाचशे क्‍विंटल मका जळून खाक झाला आहे. यामध्ये त्‍यांचे अंदाजे सहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

या घटनेचा पंचनामा करून तहसील कार्यालयात तलाठी एस आर देशमुख यांनी दाखल केला आहे.