Sat, Feb 23, 2019 18:16होमपेज › Aurangabad › तिसर्‍या मजल्यावर बँक; चौथ्या मजल्याला आग

तिसर्‍या मजल्यावर बँक; चौथ्या मजल्याला आग

Published On: Mar 14 2018 12:53AM | Last Updated: Mar 14 2018 12:53AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

गारखेडा परिसरातील सह्याद्री बाजार बिल्डिंगच्या चौथ्या मजल्यावरील स्टोअर रूमला आग लागली. आगीचे लोळ बाहेर पडल्यानंतर हा प्रकार समोर आला. मंगळवारी सायंकाळी 6 वाजता ही घटना घडली. यात 2 जनरेटर, खुर्च्या आणि इतर साहित्य खाक होऊन जवळपास दीड लाखाचे नुकसान झाले. याच बिल्डिंगच्या तिसर्‍या मजल्यावर मलकापूर अर्बन बँक आहे, हे विशेष. चुकून आग बँकेच्या मजल्यावर आली असती तर मोठे नुकसान झाले असते; परंतु सुदैवाने अग्‍निशमन दलाच्या जवानांनी वेळीच आग आटोक्यात आणली.

याबाबत अधिक माहिती अशी की, गारखेडा परिसरात गजानन महाराज मंदिरासमोर सह्याद्री बाजार नावाची चार मजली इमारत आहे. या इमारतीवर मोठे बॅनर लावलेले आहे. चौथ्या मजल्यावर स्टोअररूम असून तिसर्‍या मजल्यावर मलकापूर अर्बन बँक आहे. त्याखालील मजल्यावर विविध दुकाने आहेत. स्टोअर रूममध्ये जनरेटर, खुर्च्या आदी साहित्य ठेवलेले होते. ड्युटी इन्चार्ज एस. के. भगत, जवान सोमीनाथ भोसले, वैभव बाकडे, अशोक वेलदोडे, वाहनचालक बी. जी. मावले यांच्यासह अब्दुल अजीज, खोतकर, कोल्हे, लिमकर यांनी आग आटोक्यात आणली.