Fri, Apr 19, 2019 12:11होमपेज › Aurangabad › शिवाजीनगरात हॉटेलमध्ये धुडगूस

शिवाजीनगरात हॉटेलमध्ये धुडगूस

Published On: Dec 03 2017 2:39AM | Last Updated: Dec 03 2017 1:57AM

बुकमार्क करा

औरंगाबाद : प्रतिनिधी

देवळाई चौकाकडे येणार्‍या रस्त्यावर शिवाजीनगर परिसरातील रॉयल चायनीज हॉटेलमध्ये एकास मारहाण करून काचा फोडणार्‍या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली. 

याबाबत पोलिसांनी सांगितले की, हॉटेल व्यावसायिक साजीद खान शब्बीर खान हे शुक्रवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास रॉयल चायनीज हॉटेलमध्ये बसले होते. त्या वेळी विकास राठोड ऊर्फ विक्की व अन्य अनोळखीचे तिघे त्या ठिकाणी हातात दांडके घेऊन आले. खान यांच्या भावाबाबत त्यांनी विचारणा केली. नंतर शिवीगाळ करत खान यांना मारहाण केली. किचन काउंटरची काच फोडून नुकसान केले. तसेच खान यांच्यासह हॉटेलमधील कामगारांना जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी खान यांच्या फिर्यादीवरून सदर तिघांविरुद्ध सातारा पोलिस ठाण्यात गुन्हादाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक ओगले हे करीत आहेत.