Tue, Nov 20, 2018 19:04होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : पोटच्या मुलानेच केला जन्मदात्याचा खून

औरंगाबाद : पोटच्या मुलानेच केला जन्मदात्याचा खून

Published On: May 19 2018 7:02PM | Last Updated: May 19 2018 7:02PMपिरबावडा : प्रतिनिधी

वडील जमिनीत वाटणी देत नाहीत तर अनुदानाचे पैसे देत नसल्याच्या रागातून मुलानेच आपल्या जन्मदात्या पित्याचा निर्घुण खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. खून केल्यानंतर हा मृतदेह जाळून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे. फुलंब्री तालुक्यातील पिरबावडा येथे ही घटना घडली. तर चक्क मुलानेच या खुनाची कबुली दिल्याने पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले आहे. सतीश नारायण गाडेकर (वय -३०)  असे या आरोपीचे नाव आहे.

सूत्राकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, नारायण लक्ष्मण गाडेकर यांची पिरबावडा, ता. फुलंब्री येथे गट. नं. ३९९ येथे शेती आहे. त्याचा मुलगा सतीश गाडेकर याची आपल्या पित्यासोबत जमीन आपल्या नावावर करावी तसेच अनुदानाचे पैसे मिळावेत यासाठी वाद सुरु होता. यावेळी पिता आणि मुलाच्यात हाणामारी देखील झाली होती. याबाबत वडिलांविषयी मुलगा सतिश याच्या डोक्यात राग होता.

काल, शुक्रवार (१८ मे) च्या मध्यरात्री नारायण गाडेकर शेतात झोपले असता सतिश शेतात गेला. यानंतर पिता - पुत्रांच्यात जमीन आणि पैशावरून वादावादी तर झटापटीस सुरूवात झाली. यावेळी गाडेकर यानी सतिशच्या तावडीतुन पळण्याचा प्रयत्न केला. मात्र सतिशने आपल्या पित्याचा खून केला. याघटनेचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.