Thu, Jul 18, 2019 06:33होमपेज › Aurangabad › औरंगाबादेत ‘हाफ मर्डर’चे दहा गुन्हे

औरंगाबादेत ‘हाफ मर्डर’चे दहा गुन्हे

Published On: Jan 04 2018 1:00AM | Last Updated: Jan 04 2018 12:31AM

बुकमार्क करा
औरंगाबाद ः प्रतिनिधी

कोरेगाव-भीमा प्रकरणाचा निषेध करण्यासाठी तीन दिवसांपासून शहरात तणाव आहे. आतापर्यंत अनेक ठिकाणी दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. यात पोलिस आयुक्‍तांचेही वाहन सुटले नसून दोन दिवसांत शहरात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे दहा गुन्हे नोंद झाले असून एकूण 20 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

सिडको ठाण्याचे पोलिस निरीक्षक कैलास प्रजापती यांच्या फिर्यादीनुसार टीव्ही सेंटर भागातील सिद्धार्थ नगरमध्ये आरोपी संतोष साळवेसह जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. यात खुद्द प्रजापतींसह अनेक पोलिस जखमी झाले. जमावाने पोलिसांवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला केला. या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक सागर कोते करीत आहेत.

याशिवाय वसंत पाटील यांच्या फिर्यादीवरून राजू गौतम आव्हाड, शेख भाऊसाहेब साळवे, राहुल नंदकिशोर दाभाडे यांच्याविरुद्ध, तर सूर्यकांत मुंढे यांच्या फिर्यादीवरून मुकुंश भवरलाल पटेलसह अनोळखी एकाविरुद्ध जवाहरनगर ठाण्यात गुन्हा नोंद आहे. उस्मानपुर्‍यात उपनिरीक्षक राहुल चव्हाण यांच्या फिर्यादीवरून नारायण सुभाष साळवे, आनंद उत्तम दाभाडे, शुभम दिलीप मगरे, विशाल राजेंद्र खरात, राजू दादाराव गायकवाड, अजय अशोक म्हस्के इतर जमावाविरुद्ध पोलिसांवर जीवघेणा हल्ला केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला. अशाच स्वरूपाचे एकूण दहा गुन्हे दोन झाले असून पोलिसांनी आरोपींची धरपकड सुरू केली आहे. यापुढेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाल्यास गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद केले जातील, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.