Wed, Nov 21, 2018 15:50होमपेज › Aurangabad › बोंडआळी नुकसानग्रस्त शेतकऱ्याची आत्महत्या 

बोंडआळी नुकसानग्रस्त शेतकऱ्याची आत्महत्या 

Published On: Dec 08 2017 12:28PM | Last Updated: Dec 08 2017 12:28PM

बुकमार्क करा

औरंगाबाद : प्रतिनिधी  

बोंडआळी नुकसानग्रस्त शेतकऱ्याने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली आहे. पंढरीनाथ नारायण भवरे (वय, 30 रा. खामंखेडा ता. औरंगाबाद) असे आत्‍महत्‍या केलेल्‍या शेतकऱ्याचे नाव आहे. 

भवरे यांच्यावर बँक ऑफ बडोदा (शाखा गणोरी) चे पीक कर्ज होते. त्‍यांना एकूण चार एकर शेती होती आहे, त्यापैकी अडीच एकर शेतीमध्ये कापूस लावला होता. त्‍याच्यावर मोठ्या प्रमाणात बोंड आळीचा प्रादुर्भाव झाला होता. त्‍यामुळे सर्व कापूस पिकाचे नुकसान झाले. कापूस पिक वाया गेल्‍यामुळे बँकेचे कर्ज फेडता येणार नाही. या चिंतेने भवरे यांनी गुरुवारी रात्री १० वाजेच्या सुमारास शेतीमध्ये विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली.