Wed, Apr 24, 2019 12:25होमपेज › Aurangabad › शेतकर्‍यांना सातवा वेतन आयोग द्या

शेतकर्‍यांना सातवा वेतन आयोग द्या

Published On: Mar 20 2018 1:47AM | Last Updated: Mar 20 2018 1:47AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

शेतकरी, शेतमजूर, कष्टकर्‍यांना सातवा वेतन आयोग द्यावा, म्हातारपणासाठी पेन्शनची सोय करावी, यासह शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांकडे उपोषणाद्वारे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. यवतमाळमधील शेतकरी साहेबराव करपे यांनी 19 मार्च 1986 रोजी कर्जबाजारीपणाला कंटाळून संपूर्ण कुटुंबासह आत्महत्या केली होती, हा दिवस शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीने राज्यभरात अन्नदात्यासाठी अन्नत्याग सत्याग्रह म्हणून पाळला. या निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषणात शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

सरसकट कर्जमुक्‍ती द्यावी. शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमी भाव द्यावा. दुधाचे भाव उत्पादन खर्चावर आधारित असावे. शेतकर्‍यांच्या जमिनी संपादित करताना सर्व विस्थापितांचे पुनर्वसन करावे. सर्व कष्टकर्‍यांची अन्नसुरक्षा अबाधित राहावी, यासाठी दक्षता घ्यावी, आदी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले. सुकाणू समितीला यापूर्वी दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता करावी, अशी मागणीही निवेदनात केली आहे. आंदोलनात सुकाणू समितीचे सदस्य सुभाष लोमटे, सुभेदार मेजर सुखदेव बन, भगवान भोजने, मनोहर टाकसाळ, रमेशभाई खंडागळे, सांडू जाधव, अण्णा खंदारे, रोहिदास पवार, देविदास कीर्तीशाही यांच्यासह शेतकरी, महिला शेतकरी सहभागी झाल्या होत्या.
 

 

 

tags : Aurangabad, aurangabad news, farmer protest, 7th pay commission demand