Fri, May 24, 2019 09:05होमपेज › Aurangabad › कचर्‍याचे चोरी चोरी चुपके चुपके...

कचर्‍याचे चोरी चोरी चुपके चुपके...

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

औरंगाबाद : सुनील कच्छवे

चाळीस दिवस उलटल्यानंतरही मनपाला कचराकोंडी सोडविण्यात यश आलेले नाही. म्हणूनच की काय मनपाने शहरातील कचर्‍याची गनिमी काव्याने विल्हेवाट लावण्याचे काम सुरूच ठेवले आहे. शहरातील मिक्स कचरा गुपचूप पद्धतीने शहरालगतच्या शेतांमध्ये नेऊन टाकला जात आहे. दै. पुढारीने पालिकेच्या कचर्‍याच्या ट्रकचा पाठलाग केला असता ही बाब समोर आली. पालिकेने मंगळवारी काही ट्रक कचरा चिकलठाणा येथे शेतात नेऊन रिचविला. संबंधित शेतकर्‍यानेच शेतातील खड्डा भरून काढण्यासाठी कचर्‍याची मागणी केल्याचे सांगण्यात आले. शहरालगत इतरही काही ठिकाणी खदानींमध्ये याच पद्धतीने चोरी छुपे कचरा नेऊन टाकला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मनपाचा नारेगाव येथील जुना कचरा डेपो बंद झाल्यामुळे सध्या शहरात कचराकोंडी निर्माण झाली आहे. त्यातच शासनाने आता नव्याने कुठेही कचरा साठवू नये, तर प्रक्रिया करूनच कचर्‍याची विल्हेवाट लावण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मनपा प्रशासनाची दमछाक होत आहे. काही ठिकाणी कंपोस्ट पिट तयार करून ओल्या कचर्‍याची विल्हेवाट लावली जात आहे. सुक्या तसेच मिक्स कचर्‍याचीही विल्हेवाट योग्य पद्धतीनेच लावली जात असून कचरा कुठेही फेकला जता नसल्याचा दावा मनपाकडून केला जात आहे. मात्र मनपाचा हा दावा खोटा असल्याचे दै. पुढारीने केलेल्या पाहणीत आढळून आले. 


  •