Fri, Apr 26, 2019 16:08होमपेज › Aurangabad › कचर्‍याची खोटी आकडेवारी सांगू नका

कचर्‍याची खोटी आकडेवारी सांगू नका

Published On: May 04 2018 1:54AM | Last Updated: May 04 2018 1:13AMऔरंगाबाद : प्रतिनिधी 

सांगयचं म्हणून उगीच काहीही आकडे फुगवून सांगू नका. कचर्‍याची सत्य आणि नेमकी काय परिस्थिती आहे, त्याचीच माहिती द्या. विनाकारण दिशाभूल करू नका, काय करू शकता आणि आतापर्यंत काय केले तेच सांगा, अशा कडक शब्दांत राज्याचे प्रधान सचिव नितीन करीर यांनी महापालिका अधिकार्‍यांची चांगलीच कानउघाडणी केली. तसेच कचर्‍याची विल्हेवाट न लावणारे व्यावसायिक आणि कचरा वर्गीकरण करून न देणार्‍या नागरिकांवरही थेट दंडात्मक कारवाई करा, असे आदेश त्यांनी प्रशासनाला  दिले.
तब्बल 78 दिवसांनंतरही मनपा प्रशासनाला ही समस्या सोडवता आलेली नाही. कचर्‍याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाटीसाठी राज्य शासनाने 89 कोटींचा डीपीआर मंजूर केल्यानंतरही प्रस्तावित कामे निविदा प्रक्रियेतच अडकली आहे. याचा आढावा घेण्यासाठी प्रधान सचिव नितीन करीर यांनी विभागीय आयुक्तालयात गुरुवारी (दि. 3) सकाळी साडेअकरा वाजता बैठक घेतली.