Fri, Apr 26, 2019 19:21होमपेज › Aurangabad › विद्यापीठ निवडणुकीत आ. चव्हाण यांची आघाडी

विद्यापीठ निवडणुकीत आ. चव्हाण यांची आघाडी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

औरंगाबाद : प्रतिनिधी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा व विद्या परिषदेच्या चुरशीच्या निवडणुकीत आ. सतीश चव्हाण यांच्या उत्कर्ष पॅनलने आघाडी घेतली आहे. या निवडणुकीत आ. चव्हाणप्रणीत उत्कर्ष पॅनल, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदप्रणीत विद्यापीठ विकास मंच आणि बामुक्टो यांच्यात चुरशीची लढत झाली. अधिसभेच्या तीन गटांचे निकाल रविवारी सायंकाळी सहापर्यंत जाहीर झाले. संस्थाचालक गटातून भाऊसाहेब राजळे आणि संजय निंबाळकर या अपक्ष उमेदवारांसह उत्कर्ष पॅनलचे कपिल आकात आणि गोविंद देशमुख हे विजयी झाले. मनीषा टोपे आणि राहुल म्हस्के यापूर्वीच बिनविरोध विजयी झाले होते.

प्राचार्य गटात विद्यापीठ विकास मंचचे रामचंद्र इप्पर, हरिदास विधाते, सुभाष टकले, कमलाकर कांबळे हे विजयी झाले. या गटात उत्कर्ष पॅनलने आघाडी घेतली आहे. या पॅनलचे शिवदास शिरसाट, डॉ. प्राप्ती देशमुख, जयसिंह देशमुख, अशोक पंडित, भारत खंदारे, अली जाफर हे सहा उमेदवार विजयी झाले. विद्यापीठ शिक्षक गटातून उत्कर्ष पॅनलचे राम चव्हाण, डॉ. स्मिता अवचार आणि विकास मंचचे सतीश दांडगे हे विजयी झाले.

येळीकर पराभूत
संस्थाचालक गटातून अविनाश येळीकर यांना पराभव सहन करावा लागला. आ. चव्हाण यांच्यासाठी हा धक्का मानला जात आहे.