होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : पती-पत्नीच्या हत्येमुळे खळबळ

औरंगाबाद : पती-पत्नीच्या हत्येमुळे खळबळ

Published On: Aug 05 2018 11:51AM | Last Updated: Aug 06 2018 1:51AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

कन्नड तालुक्यात पती पत्नीची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. हसनखेडा येथील शिवारात ही घटना घडली. त्यांच्या डोक्यात आणि  शरीरावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या जखमा आढळून आल्या आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, जवळी बु. येथील कारभारी रामचंद्र शिनगारे हे आपली पत्नी यमुनाबाई सह हसनखेड़ा येथील राजेंद्र दळवी यांच्या शेतात राहात होते. यांच्या डोक्यावर अंगावर लोखंडी रॉडने मारहाण केल्याची प्राथमिक अंदाज असून यात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर वाऱ्यासारखी ही बातमी सर्वत्र पसरली. त्यानंतर घटनास्थळी मोठा जमाव असून  देवगाव पोलीस ठाण्याच्या सपोनि स्वप्ना शाहापुरकर दाखल झाल्या आहेत. 

पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात शेत वस्तीवरील घराची कडी उघडलेली असून कपाटतील सामान खाली विस्कटलेले आढळले. त्यामुळे ही हत्या चोरानी केली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला.सध्या पोलीस घटनास्थळी तपास करत आहेत. या घटनेने हसनखेडा परिसरात भीतीचे वातरावरण निर्माण झाले आहे.