Mon, Sep 24, 2018 11:06



होमपेज › Aurangabad › मराठवाडा विद्यापीठाच्या उपकुलसचिवांना अटक

मराठवाडा विद्यापीठाच्या उपकुलसचिवांना अटक

Published On: Feb 20 2018 10:03AM | Last Updated: Feb 20 2018 10:03AM



औरंगाबाद: प्रतिनिधी

नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक आणि धनादेश अनादर प्रकरणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. ईश्वरसिंग मंझा यांना अटक करण्यात आली आहे. महाविद्यालयात कारकुनाची नोकरी लावण्यासाठी मंझा यांनी तीन लाख रुपये घेतले मात्र नोकरी लागली नाही. नोकरी लावण्यासाठी घेतलेले पैसे परत मागितले असता त्यांनी दोन वेळा धनादेश दिले. मात्र ते वटले नाहीत, अशी तक्रार चिकलठाण येथील देवराव चव्हाण यांनी छावणी पोलिस ठाण्यात दिली होती. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याप्रकरणी बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे उपकुलसचिवांना अटक झाल्याने शिक्षणक्षेत्रात खळबळ उडाली आहे. नोकरी लावण्यासाठी उपकुलसचिवांनी पैसे घेतल्याने कर्मचारी वर्गातून नाराजी व्‍यक्‍त होत असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.