Sun, Mar 24, 2019 08:31होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : चिखलठाण येथे एकाचा मृतदेह आढळला; घातपाताचा संशय

औरंगाबाद : चिखलठाण येथे एकाचा मृतदेह आढळला; घातपाताचा संशय

Published On: May 23 2018 12:28PM | Last Updated: May 23 2018 12:28PMकन्नड : पुढारी ऑनलाईन 

चिखलठाण येथील शेतात एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. मृतदेहाच्या शेजारी दगड आढळल्याने हा घातपात असल्याची चर्चा आहे. 

याबाबत मिळालेली माहिती अशी की,  कन्नड तालुक्यातील चिखलठाण येथे बाजार सावंगी रोड इनाम शेतात घुसुर तांडा येथे मृतदेह आढळून आला. मृत व्यक्तीचे नाव विजय शिवलाल राठोड (वय ३२) असे आहे. मृतदेहाजवळ दगड सापडल्याने हा खुनाचा प्रकार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटना स्थळी दाखल झाले. 

ग्रामीण पोलीस उपनिरीक्षक रोहित बेंबरे यांनी घटनास्थळी पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला असून अधिक तपास सुरु आहे.