Sat, Jul 20, 2019 23:22होमपेज › Aurangabad › धुमाकूळ घालणारी चोरट्यांची गँग जाळ्यात

धुमाकूळ घालणारी चोरट्यांची गँग जाळ्यात

Published On: Apr 07 2018 1:40AM | Last Updated: Apr 07 2018 12:54AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

पाणचक्‍की परिसरातून रिक्षा चोरून बीड बायपास व समर्थनगरात धुमाकूळ घालत लूटमार करणार्‍या टोळीच्या मुसक्या आवळण्यात क्रांती चौक आणि गुन्हे शाखा पोलिसांना यश आले. एकाच रात्रीत तीन ठिकाणी चोरी करणार्‍या या टोळीतील दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून विविध पाच गुन्हे उघडकीस आले आहेत. ही कारवाई शुक्रवारी (दि. 6) करण्यात आली.बद्री राजू शिंदे (20, रा. घाटी परिसर) आणि शेख वहीद ऊर्फ शाहरूख ऊर्फ चार्ली शेख वसीम (रा. भडकल गेट) असे अटकेतील आरोपींचे नाव असून शिंदेला क्रांती चौक पोलिसांनी तर शेख वहीदला गुन्हे शाखेने पकडले. दोन्ही आरोपींना न्यायालयाने 13 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 

याबाबत पोलिसांनी सांगितले की, प्रबुब्ध नगर, पाणचक्‍की परिसरातील रहिवासी शेख अब्दुल नईम शेख अब्दुल अजीज यांची रिक्षा (क्र. एमएच 20, बीटी 6393) चोरट्यांनी पहाटे 2 वाजेच्या सुमारास चोरला. या रिक्षातून फिरत चोरट्यांनी सुरुवातीला साडेपाच वाजेच्या सुमारास बीड बायपासवरील पटेल कॉम्प्लेक्समधील जावेद खान शब्बीर खान (35, रा. सातारा परिसर) यांच्या सह्याद्री गॅस एजन्सीचे शटर उचकटले. तेथून गॅस कार्ड आणि स्वाक्षरी केलेले विविध धनादेश लंपास केल्यानंतर ही गँग याच रिक्षातून थेट समर्थनगरात आली. तेथे अंदाजे 5.45 ते 5.50 वाजेच्या सुमारास शैलजा शरदकुमार देव या 70 वर्षीय वृद्धेला लुटले. शैलजा यांच्या गळ्यातील, कानातील दागिने आणि मोबाइल लंपास केला होता. त्यानंतर रिक्षा छावणीतील ईदगाह रोड कब्रस्तानजवळ बेवारस स्थितीत उभी करून आरोपी पसार झाले होते. 

Tags : Aurangabad, criminals, gang, arrested, Police