Tue, Apr 23, 2019 14:21होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : अल्‍पवयीन मुलीला पळवून घेऊन जाणारा पोलिसांच्या ताब्यात

औरंगाबाद : अल्‍पवयीन मुलीला पळवून घेऊन जाणारा पोलिसांच्या ताब्यात

Published On: May 27 2018 3:04PM | Last Updated: May 27 2018 3:04PMकरमाड : प्रतिनिधी 

औरंगाबाद तालुक्यातील शेवगा येथील ८ वर्षीय मुलीला पळवून घेऊन जाणाऱ्या आरोपीला करमाड पोलिसांच्या ताब्यात देणयात आले. शेवगा येथून शनिवार दि.२६ मे रोजी संध्याकाळी साडेसहा वाजेपासून  बेपत्ता झाल्याची घटना घडली होती. मात्र ज्यावेळी ही मुलगी बेपत्ता झाली होती त्यावेळी एक अनोळखी व्यक्ती तिच्या सोबत बोलत असल्याचे किराणा दुकानदाराने पाहिले होते. आणि तो  काहीवेळा नंतर डोंगराच्या दिशेने गेल्याची माहिती करमाड पोलिसांना देण्यात आली होती.

या माहितीनुसार करमाड पोलिसांनी या संशियत आरोपीचा गावकऱ्यांच्या मदतीने डोंगरा डोंगराने शोध घेतला असता रविवारी दुपारी १ वाजता दरेगाव शिवारातील डोंगरात मुलाला घेऊन जाताना हा आरोपी आढळून आला. पोलिसांनी व गावकऱ्यांनी त्यांच्या पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले असून ८ वर्षीय मुलीला तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात देणयात आले आहे. 

सदर कार्यवाही पोलीस निरीक्षक बालक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार रवींद्र साळवे, सचिन राठोड, राहुल मोहतमाल व गांवकरी रफिक मिझा, कैलास सुलाने, अन्सार बेग मिझा यांनी केली. सदर आरोपीला ताब्यात घेऊन गुन्हा नोंद करण्यात आला आहे.