Sat, Nov 17, 2018 04:16होमपेज › Aurangabad › चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच, तीन ठिकाणी चोरी

चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच, तीन ठिकाणी चोरी

Published On: Jan 08 2018 1:12AM | Last Updated: Jan 08 2018 12:38AM

बुकमार्क करा
औरंगाबाद : प्रतिनिधी

काही दिवसांपासून शहरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून गारखेडा भागात आतापर्यंत 15 पेक्षा जास्त दुकाने फोडण्यात आली आहेत. उल्कानगरीत तीन दुकाने फोडल्याची घटना ताजी असतानाच शहरात हर्सूल आणि सिडको भागातही चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याचे समोर आले. 

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अशोक रामराव तोरडमल (रा. हर्सूल) यांचे घर फोडून चोरांनी सोन्याची पोत, क्रेडिट कार्ड आणि रोख पाच हजार रुपये लंपास केले. ही घटना शनिवारी (दि. 6) सकाळी दहा ते बारा वाजेच्यादरम्यान हर्सूल भागात घडली. तोरडमल कुटुंबासह बाहेरगावी गेल्यानंतर चोरीचा प्रकार घडला. दुसरी घटना हडको, एन-11 भागात घडली. चोरट्यांनी घर फोडून 21 हजार पाचशे रुपयांचा ऐवज लंपास केला. 30 डिसेंबर ते 3 जानेवारीदरम्यान रमा गौतम बोर्डे (रा. नवनाथनगर, हडको एन- 11) या कुटुंबासह माहेरी गेल्या. त्यानंतर चोराने त्यांच्या घराचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला आणि सोन्याचा नेकलेस व रोख रक्कम लंपास केली. रमा या माहेराहून परतल्यानंतर घरात चोरी झाल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी सिडको ठाण्यात गुन्हा नोंद झाला. 

गॅस एजन्सीतून लॅपटॉप लांबविला 

दित्य कमलकांत पांडे (रा. एन- तीन, सिडको) यांच्या गॅस एजन्सीतून चोराने लॅपटॉप व क्रेडिट कार्ड लंपास केले. ही घटना औताडे कॉम्प्लेक्स, जळगाव रोड येथे 5 ते 6 जानेवारीदरम्यान घडली. गॅस एजन्सीचे शटर उचकटून चोराने डल्ला मारला. या प्रकरणी हर्सूल ठाण्यात गुन्हा नोंद झाला.