होमपेज › Aurangabad › औरंगाबाद सत्र न्यायालयात दगडफेक (व्‍हिडिओ)

औरंगाबाद सत्र न्यायालयात दगडफेक (व्‍हिडिओ)

Published On: Jan 29 2018 5:37PM | Last Updated: Jan 29 2018 5:45PMऔरंगाबाद : प्रतिनिधी

येथील जालना रोडवरील जिल्हा व सत्र न्यायालयात सोमवारी दुपारी चार वाजता कुख्यात इम्रान मेहंदीच्या टोळीतील लोकांनी तुफान दगडफेक केली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून पोलिसांनी तत्काळ जास्तीचा फौजफाटा मागविला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. खुनाच्या गुन्ह्यात इम्रान मेहंदी याला तीन वर्षांपूर्वीच अटक करण्यात आलेली आहे. त्याला हर्सूल कारागृहातील अंडासेल विभागात ठेवण्यात आलेले आहे. दरम्यान, सोमवारी त्याला खटल्याच्या सुनावणीसाठी सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. यामुळे त्याच्या टोळीतील काही गुंडही येथे आले. इम्रान मेहंदी आणि कुरेशी गटाच्या टोळक्यांमध्ये वाद होऊन त्यांनी तुफान दगडफे केली. यात एका वृद्धाचे डोके फुटल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. पोलिसांनी या घटनेला दुजोरा दिला.