होमपेज › Aurangabad › छेड काढणार्‍या नगरसेवकाला अटक

छेड काढणार्‍या नगरसेवकाला अटक

Published On: Jan 16 2018 2:07AM | Last Updated: Jan 16 2018 2:00AM

बुकमार्क करा
औरंगाबाद : प्रतिनिधी

योगाच्या क्‍लासला जाणार्‍या 39 वर्षीय महिलेचा सहा महिन्यांपासून पाठलाग करून छेड काढणारा नगरसेवक तथा शिवसेनेचा मनपातील गटनेता मकरंद कुलकर्णी याला सोमवारी सिडको पोलिसांनी अटक केली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 11 जानेवारी रोजी आरोपी नगरसेवक मकरंद कुलकर्णी याने पीडितेचा पाठलाग केला.

तिच्या क्‍लासच्या ठिकाणी जाऊन ‘तू काहीही केले तरी मी तुला सोडणार नाही’ असे म्हणत त्याने पीडितेशी अश्‍लील वर्तन केले. दरम्यान, या प्रकरणी सिडको ठाण्यात कुलकर्णीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला होता. तपास अधिकारी उपनिरीक्षक सी. व्ही. ठुबे यांनी आरोपी कुलकर्णी याला घरातून ताब्यात घेतले. त्याला ठाण्यात आणून अटक केली. जामीनपात्र गुन्हा असल्याने कुलकर्णीची लगेचच जामिनावर सुटका करण्यात आली.