Wed, Jul 17, 2019 08:44होमपेज › Aurangabad › दीडशे कोटींच्या निविदा आज उघडणार

दीडशे कोटींच्या निविदा आज उघडणार

Published On: Feb 05 2018 1:29AM | Last Updated: Feb 05 2018 1:25AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

मनपाच्या वतीने दीडशे कोटी रुपयांच्या रस्ते कामांच्या  निविदा सोमवारी उघडण्यात येणार आहेत. पहिल्यांदा ठेकेदारांकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने मनपाने या निविदा पुन्हा प्रसिद्ध केल्या होत्या. आता दुसरी वेळ असल्याने प्रत्येक कामासाठी किमान दोन किंवा क्‍वचितप्रसंगी एकेक निविदा जरी पात्र ठरली तरी त्यांना हे काम देता येऊ शकते अशी माहिती मनपाच्या अधिकार्‍यांनी दिली. 
राज्य सरकारने शहरातील रस्ते सिमेंटचे बनविण्यासाठी मनपाला जून 2017 मध्ये शंभर कोटी रुपयांचे विशेष अनुदान मंजूर केले. त्यानंतर मनपाने पहिल्यांदा ऑक्टोबर महिन्यात या या निधीतील कामांचे प्रत्येकी 25-25 कोटी रुपयांचे चार तुकडे करून चार निविदा प्रसिद्ध केल्या. त्यासोबतच पालिकने स्वतःच्या निधीतूनही 25-25 कोटी रुपयांच्या रस्ते कामांच्या दोन निविदा प्रसिद्ध केल्या होत्या. या दीडशे कोटींच्या कामांसाठी निविदा दाखल करण्याची अंतिम मुदत नोव्हेंबरमध्ये संपली, परंतु प्रत्येक कामासाठी किमान तीनपेक्षा कमी ठेकेदारांच्याच निविदा पात्र ठरल्या. त्यामुळे मनपा प्रशासनाने जानेवारी महिन्यात पुन्हा या निविदा प्रसिद्ध केल्या. त्याची अंतिम मुदतही 31 जानेवारी रोजी संपली आहे. आता या निविदा सोमवारी उघडण्यात येणार आहेत.