Mon, Jan 21, 2019 13:44होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : संविधानाच्या प्रती जाळणाऱ्या समाजकंटकांचा निषेध

औरंगाबाद : संविधानाच्या प्रती जाळणाऱ्या समाजकंटकांचा निषेध

Published On: Aug 12 2018 1:34PM | Last Updated: Aug 12 2018 1:34PMऔरंगाबाद :  प्रतिनिधी 

दिल्ली येथे संविधानाच्या प्रती जाळणाऱ्या समाजकंटकाविरोधात शहरातील आंबेडकरी संघटनांतर्फे भडकल गेट येथे तीव्र निदर्शने करण्यात आली. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करून, समाजकंटाका विरोधात घोषणाबाजी करीत निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी शेकडोच्या संख्येने चळवळीतील कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.