Mon, Nov 19, 2018 15:04होमपेज › Aurangabad › बांगरवाडीतला हल्लेखोर कोंबडा अखेर बंदिवासात

बांगरवाडीतला हल्लेखोर कोंबडा अखेर बंदिवासात

Published On: Dec 10 2017 1:18AM | Last Updated: Dec 10 2017 1:13AM

बुकमार्क करा

पाटोदा : प्रतिनिधी

पाटोदा तालुक्यातील बांगरवाडी शिवारात एका कोंबड्याने दहशत निर्माण केली होती. या कोंबड्याने एका मुलावर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले होते. कोंबड्यामुळे मालकाकडे नसता भांडणे येऊ लागल्याने मालकाने अखेर या कोंबड्याला झापाखालीकोंडले आहे. या कोंबड्यास बंदिस्त करताना मालकास चांगलीच दमछाक करावी लागली.

बांगरवाडी येथील सीताराम सस्ते हा लहान मुलगा अंगणात खेळत होता. त्याच्यावर या कोंबड्याने हल्ला केला. यात सीताराम जखमी झाला असून दहा टाके पडले आहेत. गावातील बर्‍याच लोकांसह लहान मुलांवर या कोंबड्याने हल्ला करून चावा घेतला आहे. गावातीलच एका शेतकर्‍याचा हा गावरान कोंबडा आहे. दरम्यान, ग्रामस्थ लक्ष्मण सस्ते यांनी सांगितले, की मागील अनेक दिवसांपासून या कोंबड्याने
गावात दहशत माजवली आहे. हा कोंबडा लहान मुले व दुचाकीस्वारांवर देखील हल्ला करत होता. आता या कोंबड्याला कोंडले आहे. हल्लेखोर कोंबड्याच्या हल्ल्यात लहान मुलगा गंभीर जखमी झाला होता, ही बातमी शनिवारी दैनिक पुढारीत प्रसिद्ध होताच त्याची तत्काळ मराठी न्यूज चॅनलनीदखल घेतली.