Mon, May 20, 2019 08:52होमपेज › Aurangabad › कोंबड्याची दहशत; नागरीकांसह लहान मुलं टार्गेट

कोंबड्याची दहशत; नागरीकांसह लहान मुलं टार्गेट

Published On: Dec 09 2017 1:49AM | Last Updated: Dec 09 2017 1:49AM

बुकमार्क करा

पाटोदा (जि.बीड) :

पाटोदा तालुक्यातील बांगरवाडी शिवारात एका कोंबड्याने दहशत निर्माण केली आहे. दुचाकी गाडीवरील व्यक्‍तीस, लहान मुलांना हा कोंबडा चावा घेतो व जखमी करतो. बांगरवाडी येथील शेतकरी सीताराम सुरेश सस्ते नावाचा लहान मुलगा शुक्रवारी अंगणात खेळत होता. या वेळी त्याच्यावर या कोंबड्याने हल्ला केल्याने मुलगा गंभीर जखमी झाला असून दहा टाके पडले.

गावातील बर्‍याच नागरिकांना व लहान मुलांना या कोंबड्याने चावा घेऊन जखमी केले आहे.  कोंबडा दिसला तरी लहान मुले तेथून पळून जातात. नागरिकांत देखील कोंबडा हल्ला करतो की काय अशी भीती असते . या घटनेनंतर तर सस्ते यांच्या घराजवळूनही जाण्यास ग्रामस्थांना आता भीती वाटत आहे. सदरील कोंबडा हा गावातीलच एकाचा असून याप्रश्‍नी त्वरीत मार्ग काढावा अशी अपेक्षा ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे.