खासदार इम्तियाज जलील व राष्ट्रवादीचे उमेदवार कादीर मौलाना यांच्यात हाणामारी 

Last Updated: Oct 21 2019 6:59PM
Responsive image

Responsive image

औरंगाबाद : प्रतिनिधी 

शहरातील मध्य मतदारसंघातील कटकगेट-नेहरुनगर परिसरात एमआयएमचे खासदार खासदार इम्तियाज जलील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार कादीर मौलाना यांच्यात जोरदार हाणामारी झाली. यावेळी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. या वेळी पोलिसांना कार्यकर्त्यांवर सौम्य लाठीमारही करावा लागला. या परिसरात अर्धातासहून अधिककाळ तणावाचे वातावरण होते.

शहरातील मध्य मतदारसंघातील कटकटगेट-नेहरुनगर परिसरात एमआयएम उमेदवार नासेर सिद्दीकी यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार कादीर मौलाना व नगरसेवक अजीम खान यांनी हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यात वाद व बाचाबाची झाली. ही माहिती कळताच खासदार जलील घटनास्थळी दाखल झाले. इम्तियाज जलील गाडीतून उतरताच ते मौलानांच्या मंडपात गेले. जलील काही बोलण्यापूर्वीच त्यांना मारहाण करण्यास सुरूवात झाली. त्यामुळे एमआयएम कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यासह मौलाना यांना मारहाण केली. पोलिसांनी लाठीचार्ज सुरू करताच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पळून गेले.