Mon, Aug 19, 2019 17:30होमपेज › Aurangabad › स्वस्त कर्जासाठी भामट्यांचे मेसेज

स्वस्त कर्जासाठी भामट्यांचे मेसेज

Published On: Mar 24 2018 2:13AM | Last Updated: Mar 24 2018 1:46AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

मोबाइल किंवा ई-मेलवर मेसेज टाकून स्वस्तात कर्जपुरवठा करण्याचे आमिष दाखविणारी भामट्यांची टोळी सक्रिय झाली आहे. भामटेगिरीच्या या प्रकाराला आळा घालण्यासाठी सद्यःस्थितीत यंत्रणेकडे कोणत्याही ठोस अशा उपाययोजना नसल्याने ही भामटेगिरी फोफावत चालली आहे.

सर्वच कर्जपुरवठ्याचे मेसेज करणार्‍या सर्वच कंपन्या बोगस नाहीत, मात्र, यातील निम्म्यापेक्षा जास्त नॉन बँकिंग असणार्‍या कंपन्या बोगस आहेत.  यातील काही भारतातून तर काही विदेशातून संचालित केल्या जातात. वेगवेगळी आमिषे दाखवून दिवसातून एक-दोन तरी ग्राहक मिळाले तरी या भामट्यांचे चांगलेच फावते. बँकिंग क्षेत्र ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी जाहिरातींचा आधार घेतात. यासाठी मेसेज व ई-मेलचाही आधार घेतला जातो. मात्र, त्यात फक्‍त माहिती असते. त्यात फसवणूक होत नाही. भामटेगिरी करणार्‍या नॉन बँकिंग कंपन्या ग्राहकांना अगोदर काही रक्‍कम भरण्याचे सांगतात. कमी व्याजदरात व विनाझंझट कर्ज मिळत असेल तर ग्राहकही याला फसतात..

अशी होते फसवणूक

मोबाइल किंवा ई-मेलवर मेसेज टाकून प्रचलित बँकांपेक्षा अत्यंत कमी व्याजदराने कर्जपुरवठ्याचे आमिष दाखविले जाते. विशेष म्हणजे यात जास्त कागदपत्रांचे काम नसल्याने ग्राहक आकर्षित होतात. कंपनीशी संपर्क साधल्यानंतर  ते ग्राहकांची बँक अकाउंटसह सर्व माहिती जाणून घेतात. सुरुवातीला विशिष्ट रक्‍कम भरण्याचे सांगितले जाते. रक्‍कम भरल्यानंतर दोन ते तीन दिवसांनंतर पुन्हा मेसेज पाठवून कर्ज मंजूर झाल्याचे सांगून आणखी रक्‍कम भरण्यास सांगितली जाते. रक्‍कम भरल्यानंतर पुन्हा कधीही संपर्क होऊ शकत नाही. काहीजण बँकेचे डिटेल जाणून नंतर ग्राहकांच्या खात्यातून पैसे काढून घेतात.

Tags : Auramgabad, Aurangabad News, cheap loan, fraud peoples, MSG , e mails,  for cheap loan