Thu, Jun 27, 2019 15:45होमपेज › Aurangabad › ऊस आंदोलनकर्त्या ४९ शेतकर्‍यांवर न्यायालयात आरोपपत्र दाखल 

ऊस आंदोलनकर्त्या ४९ शेतकर्‍यांवर न्यायालयात आरोपपत्र दाखल 

Published On: Dec 31 2017 1:30AM | Last Updated: Dec 31 2017 1:05AM

बुकमार्क करा
पैठणः प्रतिनिधी 

उसाला प्रति टन 3 हजार 100 रुपये भाव, देण्यात यावा या मागणीसाठी 15 नोव्हेंबर रोजी शेवगाव तालुक्यातील खानापूर येथे शेतकर्‍यांनी रास्तारोको आंदोलन केले होते. यावेेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर गोळीबार करून हे ऊस आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, याप्रकरणी औरंगाबाद आणि नगर जिल्ह्यातील 14 ऐवजी 49 शेतकर्‍यांवर गुन्हे दाखल करून त्यांच्या विरोधात अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. 

या  आंदोलना दरम्यान एक बस जाळण्यात आली होती, तसेच दगडफेकीत अनेक बसेसच्या काचाही फुटल्या होत्या. आंदोलन पांगविण्यासाठी शेवगाव पोलिसांनी थेट निशस्त्र आंदोलक शेतकर्‍यांवर गोळीबार केला. या गोळीबारात पैठण तालुक्यातील तेलवाडी येथील शेतकरी उद्धव विक्रम मापारी व नारायण भानुदास दुकळे हे दोघे गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांच्यावर अहमदनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.  यावेळी राज्य गृहमंत्री दीपक केसरकर यांनी जखमी शेतकर्‍यांची भेट घेत ऊस आंदोलक शेतकर्‍यांवरील सर्व गुन्हे मागे घेतले जातील, असे आश्वासन दिले होते, मात्र केसरकर दिलेले आश्‍वासन विसरल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष प्रकाश बालवडकर यांनी केला.