Wed, Apr 24, 2019 00:08होमपेज › Aurangabad › महावितरणच्या हलगर्जीपणामुळे दोन एकर गहू जळाला

महावितरणच्या हलगर्जीपणामुळे दोन एकर गहू जळाला

Published On: Apr 14 2018 1:43AM | Last Updated: Apr 13 2018 6:56PMबोर देगगाव ( औरंगाबाद ) : प्रतिनिधी

बोर दहेगाव येथील गट नंबर चार मधील  सव्वादोन एकर शेतातून जाणाऱ्या विद्युत तारांचे घर्षण होऊन सव्वा दोन एकर गहू  जळून खाक झाला. 

बोर दहेगाव येथील शेतकरी वाल्मिक भाऊसाहेब उगले यांच्या मालकीची पाच एकर जमीन   आहे. त्यापैकी त्यांनी सव्वादोन एकरावर गहू केला होता. गहू ऐन काढणीच्या भरात असतांना वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणा ह्या शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले. वाल्मिक उगले यांच्या शेतातून वीज पुरवठा करणाऱ्या तारांची लाईन जाते. या तारांना मोठया प्रमाणावर झोळ पडलेला (तारा लोंबकळत)असल्याने, गुरुवारी दुपारी अडीच वाजता तारेला तार चिटकून आगीचे लोळ खाली गव्हाच्या शेतात पडले. उभ्या गव्हाचे संपूर्ण शेत या आगीमुळे जळून खाक झाले. जवळपास सव्वा दोन एकर गहू जळाला. आग विझवण्यासाठी गावातील नागरिक आणि शेतकरी यांनी आग विझवण्याचा कसोशिकचे प्रयत्न केला पण, आग  विझवण्यासाठी कुठलीही यंत्रणा नसल्यामुळे आग आटोक्यात आली नाही. 

संबधित घटनेला वीज वितरण कंपनीच जबाबदार असल्याचे शेतकरी वाल्मिक उगले यांनी सांगितले. आमच्या शेतातून जाणारी विद्युत तारा ह्या मोठया प्रमाणावर लोंबकळत असल्याने वेळीच दुरुस्ती करण्यासाठी संबधितिकडे आम्ही वारंवार मागणी केली होती. परंतु त्यांनी कुठलीही कार्यवाही केली नाही आणि त्याच तारांमध्ये स्पार्क होऊन संपूर्ण गहू जळून खाक झाला.
या प्रकरणी महावितरणचे लाईनमन लक्ष्मण भालेराव यांनी प्रतिक्रिया देताना ‘विद्युत पुरवठा करणाऱ्या तारा ह्या जीर्ण झाल्यामुळे आणि तारांना मोठा झोळ पडल्यामुळे ही दुर्घटना घडली. आम्ही ही लाईन दुरुस्ती करणार होतो पण, अगोदरच ही गहू जळण्याची दुर्घटना घडली.