Wed, Nov 21, 2018 12:06होमपेज › Aurangabad › पैठण शहरात कारने घेतला अचानक पेट

पैठण शहरात कारने घेतला अचानक पेट

Published On: Jun 16 2018 5:08PM | Last Updated: Jun 16 2018 5:08PMपैठण : प्रतिनिधी

शहरातील शिवाजी महाराज चौकात उभा असलेल्या कारने अचानक पेट घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. पेटलेली कार रस्त्यावर धिम्या गतीने धावल्याने चौकात उभा असलेल्या तरुणांनी व पोलिसांनी पाणी टाकून कारला लागलेली आग अटोक्यात आणली. वेळीच आग अटोक्यात आणल्याने मोठी दुर्घटना टळली.

ही घटना शनिवारी दुपारी दोन वाजता घडली. शहागड तालुका गेवराई येथील रहिवासी शरद कोडाजी ऐटाळे याच्या मालकीची (एमएच१० बीटी ५४६२) ही कार घेऊन चालक विशाल म्हस्के हा पैठणमध्ये आला होता. यावेळी दुपारी कार थांबली असता अचानक कारच्या पुढील भागातून धूर येऊ लागला. यानंतर कारने पेट घेतला. येथील नागरिकांनी आग विझवण्यासाठी प्रयत्‍न केला असता कार चालक नसताना पुढे जाऊ लागली. कार पुढे गेल्याने नागरिकात भितीचे वातावरण पसरले होते. या घटनेवेळी युवक व पोलिसांनी पाणी टाकून कारला लागलेली आग अटोक्यात आणली.