Mon, Nov 19, 2018 10:32होमपेज › Aurangabad › औरंगाबादमध्ये व्यावसायिकाचा निर्घृण खून 

औरंगाबादमध्ये व्यावसायिकाचा निर्घृण खून 

Published On: Dec 28 2017 12:23PM | Last Updated: Dec 28 2017 12:23PM

बुकमार्क करा
औरंगाबाद : प्रतिनिधी 

छावणी परिसरात व्यावसायिकाचा रॉडने मारहाण करून खून केला. हुसेन खान अलियार खान उर्फ शेरखान (रा. पेन्शनपुरा, औरंगाबाद) असे खून झालेल्‍या व्यावसायिकाचे नाव आहे. या प्रकरणी अन्सारखान हुसेनखान यांच्या फिर्यादीवरून अथरखान फजिलोदृीनखान, जगीरखान उस्‍मानखानख,  श. नजीब इस्‍माईल, अब्‍दुल इर्शाद अब्‍दुल गफ्फर उर्फ बाबू यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

गुरुवारी पहाटे दोनच्या सुमारास लक्ष्मी कोलोणीत ही घटना घडली. प्लॉटिंगच्या वादातून हा खून झाल्याचा संशय छावणी पोलिसांनी व्यक्त केली आहे.