Tue, Feb 19, 2019 22:50होमपेज › Aurangabad › एसटी कर्मचारी पुन्हा संपाच्या तयारीत 

एसटी कर्मचारी पुन्हा संपाच्या तयारीत 

Published On: Feb 05 2018 1:29AM | Last Updated: Feb 05 2018 1:16AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

नुकतीच महाराष्ट्र एस.टी. वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेच्या तळेगाव दाभाडे येथे झालेल्या केंद्रीय कार्यकारिणीची बैठक पार पाडली. बैठकीत कामगारांच्या पगार वाढीसंदर्भात बेमुदत संप सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा संघटनेचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी केली.

या बैठकीत कामगारांच्या पगार वाढीबाबत सरकार नकारार्थी भूमिका घेत आहे. दिवाळीच्या दरम्यान याच मागणीसाठी चार दिवस संप पुकारला होता. त्यावेळी वेतन वाढ देण्याचे आश्‍वासन दिले होते, परंतु आता त्याकडे कानाडोळा करत आहे. यामुळे लवकरच बेमुदत संप पुकारण्यात येणार आहे. बैठकीत वैजापूर आगारात कास्ट्राईब संघटनेच्या सर्व पदाधिकारी सभासदांनी इंटकमध्ये प्रवेश केला.