Tue, Mar 19, 2019 03:10होमपेज › Aurangabad › जळालेल्या अवस्थेत आढळला तरुणाचा मृतदेह 

जळालेल्या अवस्थेत आढळला तरुणाचा मृतदेह 

Published On: Dec 26 2017 1:31AM | Last Updated: Dec 26 2017 12:39AM

बुकमार्क करा

पिशोर : प्रतिनिधी

फुलंब्री तालुक्यातील एकघर पाडळी शिवारात 30 ते 35 वयाच्या तरुणाचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सोमवारी सकाळी आढळून आल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, या तरुणाचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उदेशाने अज्ञात आरोपींनी त्याचा मृतदेह पोत्यात भरून मकाच्या भुशाला आग लागून त्याला जाळून टाकण्यात आल्याचा संशय व्यक्‍त करण्यात येत आहे. 

यासंदर्भात पिशोर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अभिजीत मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार फुलंब्री तालुक्यातील निधोना-पिशोर मार्गावरील एकघर पाडळी शिवारातील सुभाष तुळशीराम साबळे यांच्या शेतात (गट नंबर 55) अंदाजे 30 ते 35 वयाच्या तरुणाचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सोमवारी सकाळी आढळून आला. साडेपाच फूट उंची, मध्यम बांधा, उजव्या हातात तर्जनी व अनामिका, बोटात दोन अंगठ्या, निळ्या रंगाची अंडरवेल, असे वर्णय या व्यक्‍तीचे आहे. या तरुणाचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उदेशाने त्याचा मृतदेह पोत्यात भरून मकाच्या भुशाला आग लागून अज्ञात आरोपींनी त्याला जाळून टाकण्यात आल्याचा संशय व्यक्‍त करण्यात येत आहे. हा प्रकार रविवारी ते सोमवारी दरम्यान घडला असावा, अशी शक्यता आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर एकघर पाडळीचे पोलिस पाटील कचरू काशिनाथ साबळे यांनी पिशोर पोलिस ठाण्यात माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास सपोनि अभिजीत मोरे करीत आहेत. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी त्याला औरंगबाद येथील घाटी रुग्णालयात पाठविले आहे. रात्री उशिरापर्यंत मृताची ओळख पटली नव्हती.