Thu, Jun 27, 2019 01:56होमपेज › Aurangabad › वाळूज महानगरात बुद्ध जयंती उत्साहात

वाळूज महानगरात बुद्ध जयंती उत्साहात

Published On: May 01 2018 1:15AM | Last Updated: May 01 2018 12:33AMवाळूज महानगर : प्रतिनिधी

तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी वाळूज महानगरात पदयात्रा, सामूहिक बुद्धवंदना, अन्नदान, खीरदान तसेच मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

वडगाव 

वडगाव येथे आनंद बुद्ध विहार समिती, भारतीय बौद्ध महासभा तसेच समता सैनिक दलाच्या वतीने बुद्ध जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 9 वाजता गौतम बुद्ध तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली. त्यानंतर काढण्यात आलेल्या पदयात्रेचा समारोप पंचशील बुद्ध विहारात करण्यात आला. यावेळी भन्तेजी संघरत्न यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. 

अन्नदान वाटपाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी प्रकाश निकम, शारदा पाईकराव, शेषराव जोगदंडे, अशोक पठारे, गयाबाई साळवे, दत्ता गायकवाड, सागर शेजवळ, देवानंद सावते, संतोष लाठे, रमेश दाभाडे, विमल दळवी, सुरेखा केदारे, अश्‍विनी आराक, संतोष पठारे आदींची उपस्थिती होती.  

तिसगाव

तिसगाव येथील बोधिसत्व ध्यान साधना केंद्रात तथागत भगवान बुद्ध जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 11वाजता माजी सरपंच अंजन साळवे यांच्या हस्ते पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अशोक त्रिभुवन, बाबासाहेब साळवे, किसन म्हस्के, भूषण साळवे, बाबासाहेब रायकर, जितेंद्र दाभाडे, साहेबराव खरात, बाळा गवले, साळवे, अ‍ॅड. रसाळ आदींची उपस्थिती होती.