Wed, Mar 27, 2019 01:57होमपेज › Aurangabad › व्हॉट्सअ‍ॅपमुळे सापडला मुलगा 

व्हॉट्सअ‍ॅपमुळे सापडला मुलगा 

Published On: Dec 13 2017 10:56AM | Last Updated: Dec 13 2017 10:56AM

बुकमार्क करा

हिंगोली : प्रतिनिधी

माणिक स्मारक आर्य विद्यालयातील ओम दादाराव राऊत या पाचवीच्या मुलाला कोणीतरी पळवून नेल्याबाबत हिंगोली शहर पोलिसात अज्ञात  आरोपीवर गुन्हा दाखल झाला होता. महिला पोलिस उपनिरिक्षक प्रेमलता गोमासे यांनी  त्या मुलाचा फोटो पोलीस ठाण्यासह मोबाईलच्या  अनेक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर टाकला होता. 

ओम राऊत हा विद्यार्थी स्वतःच रेल्वेतून 9 डिसेंबरला अकोला येथे गेला होता. मित्रासोबत तो पुढे जात असताना मध्येच त्याचे मित्र उतरून गेले. या दरम्यान रेल्वेतील. एका प्रवाशाला व्हॉट्सअ‍ॅपवरील  ओमचा फोटो दिसल्याने त्याची माहिती  पोलिसांना देताच बडनेरा पोलिसांनी  ओमला ताब्यात घेतले. त्याच्या जवळील ओळखपत्रावरून  नातेवाईक व पोलिसांना संपर्क साधल्यावर हिंगोलीत आणून 11 डिसेंबरला  ओमला पोलिसांनी कुटबिीयांच्या स्वाधीन केले.