Mon, Apr 22, 2019 04:01होमपेज › Aurangabad › ‘...तर आम्ही शिवसेनेला हवी ती मदत करू’

‘...तर आम्ही शिवसेनेला हवी ती मदत करू’

Published On: Dec 25 2017 11:54AM | Last Updated: Dec 25 2017 11:54AM

बुकमार्क करा

खुलताबाद : प्रतिनिधी

औरंगाबादचे संभाजीनगर म्हणून नामांतर करण्यासाठी जिल्ह्यात  ठिकठिकाणी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या वतीने जे आंदोलन करण्यात येत आहेत, ते फक्त जनतेची  दिशाभूल, भावनिक मुद्दे समोर ठेवून करण्यात  येत आहे. हिम्मत असेल याबाबतचा नामांतराचा मुद्दा जिल्हा परिषद ठरावात मांडावा. तो ठराव संमत करण्यासाठी आम्ही हवे ते सहकार्य करू, असे भाजप  प्रदेश उपाअध्यक्ष भागवत कराड यांनी म्हटले आहे.

येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, जिल्हा  परिषदेच्या अध्यक्षा या शिवसेनेच्या असून जि. प. मध्ये शिवसेना व त्यांचे मित्रपक्षांची सत्ता असतानाही खा. खैरे जिल्हा परिषदेमध्ये औरंगाबादचे नाव  बदलून संभाजीनगर करण्याबाबतचा ठराव न मांडता काही महिन्यावर येऊन ठेपलेली मनपा निवडणूक डोळयासमोरच ठेवून  उगाच  जिल्हाभरात शिवसेनेच्या वतीने  निदर्शने, आंदोलन केली जात आहेत. हे आंदोलन म्हणजे फक्त जनतेची  दिशाभूल आणि भावनिक मुद्दे समोर ठेवून करण्यात येत आहे. जिल्ह्यात कोणती  विकास कामे केले आहेत, ती सांगायची सोडून उगाच जिल्ह्यातील जनतेच्या मनात हिंदूत्वाचे धार्मिक भावना भडकावण्याचे काम खा. खैरे करीत आहेत, अशी टीका कराड यांनी केली.

जनता आता खूप  हुशार झाली  आहे. त्यांना आता विकास कामे हवी आहेत, असे ते म्हणाले. पत्रकार परिषदेला भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संजय खंबायते, अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष नबी पटेल, जिल्हा  सरचिटनिस सत्तार पटेल, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्‍वर नलावडे, उपनगरध्यक्ष सुरेश मरकड, माजी उपसभापती दिनेश अंबोरे, अल्पसंख्याक विभागाचे तालुकाध्यक्ष मुक्तार पठाण, नगरसेवक अविनाश  कुलकर्णी,  परसराम बारगळ, तालुका सरचिटनिस प्रकाश वाकळे, माजी नगरसेवक आशिष कुलकर्णी, युवा तालुकाध्यक्ष विकास कापसे, तालुका उपाध्यक्ष संतोष गायकवाड, जाबेर गुलाब, अन्वर भाई, शहरध्यक्ष सय्यद अफसर यांची उपस्थिती होती