Wed, Feb 20, 2019 02:34होमपेज › Aurangabad › बाळ रडलं म्हणून दाम्पत्यास मारहाण

बाळ रडलं म्हणून दाम्पत्यास मारहाण

Published On: Jan 28 2018 2:25PM | Last Updated: Jan 28 2018 2:25PMऔरंगाबाद : प्रतिनिधी

लहान बाळ रडते म्हणून त्रास होत असल्याचे सांगत दाम्पत्यास मारहाण करणार्‍या चार जणांविरुद्ध सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

शेख हनिफ, शेख हाफिज, शेख रईस व शेख वसीम रा. गणेश कॉलनी अशी आरोपींची नावे आहेत. दिलावर खान शौकत खान यांच्या घरातील बाळ हे 25 जानेवारी रोजी मध्यरात्री रडत होते. यावेळी शेख बंधूंनी आम्हाला त्रास होत आहे, असे म्हणत वाद घातला. खान हे त्यांना समजावित असताना चौघांनी त्यांच्यासह पत्नी व बहिणीस लाकडी दांड्याने मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली आहे. पोलिस हवालदार फुले तपास करत आहेत.