Tue, Apr 23, 2019 14:04होमपेज › Aurangabad › आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदी अशोक तेजनकर 

आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदी अशोक तेजनकर 

Published On: Feb 24 2018 9:22AM | Last Updated: Feb 24 2018 10:05AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

देवगिरी कॉलेजचे उपप्राचार्य व जलतज्ञ प्रा. डॉ. अशोक तेजनकर यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे पहिले प्र- कुलगुरू म्हणून कुलपती तथा राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी नियुक्ती केली आहे.

सरांचा शिक्षण प्रशासन, भूगर्भ संशोधन क्षेत्रातील २८ वर्षांचा अनुभव, तसेच जल क्षेत्रातील विविध संशोधन प्रकल्प, भारत सरकारच्या स्‍कील इंडिया प्रकल्पात सहभाग महाराष्ट्र-इस्राईल जलनियोजन समितीवर केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन ही नियुक्ती केलेली आहे. याबाबतचे राजभवनातून पत्र पाठविण्यात आले आहे.