Sat, Apr 20, 2019 09:52होमपेज › Aurangabad › #Women’sDayजिद्दीच्या बळावर मनीषाताईंचा गृहउद्योगाचा डोलारा

#Women’sDayजिद्दीच्या बळावर मनीषाताईंचा गृहउद्योगाचा डोलारा

Published On: Mar 08 2018 2:06AM | Last Updated: Mar 08 2018 2:06AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

ल्कानगरी येथे राहणार्‍या मनीषा महेश देशपांडे यांचे पती खाजगी कंपनीत नोकरी करतात. पतीला संसारात मदत करावी म्हणून मनीषाताईंनी घरगुती उपवासाचे आणि उन्हाळी पदार्थ विकण्याला सुरुवात केली. सुरुवातीला हा उद्योग विस्तारण्याची कल्पनाही त्यांनी केली नव्हती. मात्र, पतीच्या प्रेरणेने त्यांना स्फूर्ती आली. 

त्यानंतर त्यांनी पाच किलोपासून हे पदार्थ बनविण्याला सुरुवात केली. यात दिवाळी फराळाचे करंज्या, लाडू, चकल्या त्यांनी बनविल्या. सुरुवातीला या विकल्या जातील की नाही याची त्यांना शंका होती. मात्र, दर्जा चांगला असल्याने त्या हातोहात गेल्या. तेव्हापासून मनीषाताईंनी मागे वळून पाहिले नाही. त्यांच्याकडे उपवासाच्या पदार्थांची सर्वात जास्त मागणी असते. त्यात, भगरपीठ, राजगिरा पीठ, साबुदाणा पीठ, उपवास भाजणी, बटाटा चकली, बटाटा पापड, शिंगाडा शेवई, साबुदाणा पळीपान, बटाटा चिप्स, उन्हाळी पदार्थांमध्ये खारुडी, मुुंगवडी, तांदुळपापड, नाचणी पापड, ज्वारी पापड, मका पापड, पोहेपापड, गहू, कुरडई, हाताने तयार केलेली शेवई, मशीन शेवई आदी पदार्थांच्या त्यांना घरपोच ऑर्डर येतात. त्याचप्रमाणे त्या पूजेचे साहित्यही विकतात. त्यांच्या जिद्द, मेहनत आणि चिकाटीमुळे आज जगदंब गृहउद्योग भरभराटीला आला आहे. 

पती व संसाराला मदत करावी म्हणून सुरू केलेला घरगुती पदार्थांचा गृहउद्योग जिद्द आणि चिकाटीमुळे आज चाळीस महिलांना रोजगार उपलब्ध करून देत आहे. 5 किलोपासून केलेली सुरुवात मेहनतीच्या बळावर आज 8 ते 10 क्विंटलपर्यंत पोहोचली आहे. ही किमया साध्य केली आहे.