Tue, Sep 25, 2018 00:46होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : दंगलग्रस्त भागाची पोलिस आयुक्तांकडून अचानक पाहणी

औरंगाबाद : दंगलग्रस्त भागाची पोलिस आयुक्तांकडून अचानक पाहणी

Published On: Jun 01 2018 12:35AM | Last Updated: Jun 01 2018 12:36AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

पाच महिन्यात चार दंगलीने होरपळलेल्या औरंगाबादच्या पोलिस आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर तिसऱ्याच दिवशी चिरंजीव प्रसाद यांनी दंगलग्रस्त भागाची पाहणी केली. दोन्ही गटाच्या नागरिकांशी जैन धर्मशाळेच्या पवनशेठी सभागृहात त्यांनी चर्चा करून औरंगाबादच्या जनतेला शांततेचे आवाहन केले.

विशेष म्हणजे, 11 मे रोजी ज्या वेळेत ही दंगल सुरू झाली त्याच वेळेत पोलिस आयुक्तांनी या भागात जाणे पसंद केले. सोबतीला केवळ विशेष शाखेचे एसीपी भापकर, पोलिस निरीक्षक शेषराव उदार आणि त्यांचा स्टाफ होता. आयुक्तांनी दोन्ही गटाकडून माहिती घेत शहर शांत ठेवण्याची जबाबदारी आपलीच असलाचे सांगितले. 

पहिल्या दिवसापासून सामाजिक सलोखा राखण्याची साद घातलेल्या आयुक्तांनी चटकन हे पाऊल आहे. रमजानमुळे रात्रीची नमाज अदा केल्यावर मुस्लिम बांधव आणि रात्रीचे जेवण करून हिंदू बांधव फ्री होत असल्याने रात्री 10.30 वाजेची वेळ निवडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

तो आला अन गोळीबार करून गेला

राजाबाजार, नवाबपुरा या दंगलग्रस्त भागाची पाहणी करून नवनियुक्त आयुक्त चिरंजीव प्रसाद जात नाहीत तोच तेथून जवळच असलेल्या टाऊन हॉल उड्डाणपुलाजवळ दुचाकीवरून आलेल्या एकाने हवेत गोळीबार केला आणि धूम ठोकली. हा खळबळजनक प्रकार गुरुवारी रात्री 12 वाजता घडला. विशेष म्हणजे, पोलिसांना हा प्रकार समजताच रात्र गस्तीवरील सर्वांनी त्याचा शोध सुरू केला होता. तो दुचाकीने आला आणि गोळी झाडून पळून गेला. त्यामुळे गोळीबार करणारा तो कोण? या प्रश्नाने पोलिसही व्याकुळ झाले होते.