Sat, Nov 17, 2018 14:16होमपेज › Aurangabad › औरंगाबाद ग्रामसेवकाच्या अकार्यक्षमतेमुळे लाखो रुपयांचा निधी परत 

औरंगाबाद ग्रामसेवकाच्या अकार्यक्षमतेमुळे लाखो रुपयांचा निधी परत 

Published On: Jun 02 2018 1:06PM | Last Updated: Jun 02 2018 1:06PMलासुर स्टेशन : प्रतिनिधी  

लासुर स्टेशन परिसरातील धामोरी खुर्द ता गंगापूर येथील ग्रामसेवकाच्या अकार्यक्षमतेमुळे लाखो रुपयांचा निधी शासन जमा झाला असून यामुळे धामोरी खु. या गावाचा विकास खुंटला. या बाबत लासुर ग्रामस्थानी ग्रामसेवक आरु यांची जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व गट विकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. त्या तक्रारीवरून ग्रामसेवक के.एस आरु यांची चौकशी करण्याचे आदेश काढण्यात आले.  

धामोरी खुर्द ता. गंगापूर येथे प्रशासनाकडून अंगणवाडी इमारत बांधकामासाठी अंदाजे अडीच लाख रुपये मंजूर असून देखील ग्रामसेवकाच्या उदासीनतेमुळे हा निधी परत गेला आहे. तसेच आमदार प्रशांत बंब यांच्या स्थानिक विकास निधीतून व्यायामशाळा बांधकाम करण्यासाठी पाच लाख रुपये  आणि गाव-अंतर्गत पथदिवे बसविण्यासाठी  पाच लाख रुपये असा एकूण १२ लाख ५० हजार रुपयांचा निधी मिळालेला होता. परंतु  ग्रामसेवक  आरु  यांनी निधी उपलब्ध असून देखील ग्रामपंचायतीची कामे मार्गी लावली नाहीत. प्रशासनाच्या विविध योजना मार्गी लावणे ही ग्रामसेवक या नात्याने आरु यांची जबाबदारी आहे. तथापि आरु  यांनी कर्तव्यात कसूर करून, ग्रामपंचतीच्या विकास कामात उदासीनता दाखविली. 

केवळ आरु  उदासीनतेमुळे ग्रामपंचतीचा लाखो रुपयांचा निधी परत गेला असल्याचेही ग्रामस्थ सांगत आहे.

आरु यांच्यावर निलंबन व्हावे 

ग्रामसेवक आरु यांच्या अकार्यक्षमतेमुळे ग्रा.पं.चे विकासाचे प्रचंड नुकसान झाले आणि गावाचा विकास खुंटला आहे. यामुळे ग्रामसेवक यांची चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कार्यवाही करावी अशा स्वरूपाची तक्रार रवींद्र चव्हाण यांनी गट विकास अधिकारी तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली होती. त्यानुसार गट विकास अधिकारी पंचायत समिती गंगापूर यांनी चौकशी आदेश दिले आहेत.

 

Tags : aurangabad, Aurangabad news, fund went back, lasur station development stop