होमपेज › Aurangabad › यंदा आठवी, दहावी अभ्यासक्रम बदलणार

यंदा आठवी, दहावी अभ्यासक्रम बदलणार

Published On: Jan 10 2018 6:14PM | Last Updated: Jan 10 2018 6:51PM

बुकमार्क करा
औरंगाबाद : प्रतिनिधी

यंदाच्या 2018-19 या शैक्षणिक वर्षापासून आठवी व दहावीचा अभ्यासक्रम बदलणार आहे. त्यामुळे नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना त्याची नवीन  पुस्तके उपलब्ध होणार आहेत. घोकमपट्टी पद्धतीला दूर करत कृतीयुक्त, उपयोजनात्मक (अ‍ॅप्लिकेशन बेस) असा हा अभ्यासक्रम असणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक भांडार व वितरण केंद्र, औरंगाबादचे भांडार व्यवस्थापक बी.एन. पुरी यांनी दिली. 

सुधारित बदलाच्या अभ्यासक्रमानुसार येत्या शैक्षणिक वर्षापासून आठवी व दहावीच्या अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तके बदलणार आहेत. त्यानुसार अभ्यासक्रमातील बदलाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्‍यामुळे यंदाच्या वर्षी विद्यार्थ्यांच्या हातात नव्या अभ्‍यासक्रमाची नवी पुस्तके येणार आहेत. याआधी इयत्ता दहावीचा अभ्यासक्रम 2013-14  या शैक्षणिक वर्षात बदलण्यात आला होता