Sat, Feb 23, 2019 00:16होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : विद्‍युत तारेच्या स्‍पर्शाने पिता पुत्राचा मृत्‍यू 

औरंगाबाद : विद्‍युत तारेच्या स्‍पर्शाने पिता पुत्राचा मृत्‍यू 

Published On: Jul 08 2018 5:01PM | Last Updated: Jul 08 2018 5:01PMकरमाड  :  प्रतिनिधी

औरंगाबाद तालुक्‍यातील चित्‍तेपिंपळगाव येथे घरावरून गेलेल्‍या विद्‍युत तारेला स्‍पर्श झाल्‍याने वडील आणि मुलाचा दुर्देवी मृत्‍यू झाला. ही घटना आज रविवार दि ८ जुलै रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली. 

चित्तेपिंपळगाव येथील खंडागळे यांच्या घरावरून विद्युत तार गेली आहे. या तारेला स्‍पर्श झाल्‍याने बद्रि खंडागळे (वय २७) हा विजेच्या तारेला चिकटुन बसला. हे पाहिल्‍यावर त्‍याला वाचविण्यासाठी त्‍याचे वडील शिवाजी खंडागळे (वय ५५) गेले असता विजेच्या तारेला तेही चितकले. यावेळी त्‍यांनाही विजेचा धक्‍का बसला. या घटनेत पिता पुत्र दोघांचाही मृत्‍यू झाला. 

यावेळी बद्री यांची पत्नी रेणुका खंडागळे यांनी मुलगा आणि नवरा दोघे विजेच्या तारेला चिकटलेले पाहून आरडाओरडा केला. त्यामुळे शेजरील सर्व नागरिक त्यांच्या घरापाशी जमा झाले. यावेळी नागरिकांनी स्थानिक  लाईनमनला फोन करून संपर्क साधला आणि  विजपुरवठा खंडित करण्यास सांगितले. वीज पुरवठा खंडित केल्यानंतर खंडागळे बापलेकाला औरंगाबाद येथील शासकीय घाटी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. सदर घटनेने सर्व गावांत हळहळ व्यक्त केली जात असून गावावर शोककळा पसरली आहे.