Wed, Aug 21, 2019 15:44होमपेज › Aurangabad › सिल्लोड : पाझर तलावात बुडून ३ मुलांचा मृत्यू

सिल्लोड : पाझर तलावात बुडून ३ मुलांचा मृत्यू

Published On: Apr 11 2018 4:04PM | Last Updated: Apr 11 2018 4:04PMसिल्लोड : प्रतिनिधी 

सिल्लोड शहरातील राजालवाडी पाझर तलावावर पोहायला गेलेल्या तीन किशोर वयीन मुलांचा तळ्यात बुडून मृत्यु झाल्‍याची दुदैवी घटना घडली. बुडून मत्‍यू पावलेली ही मुले सिल्लोड शहरातील स्नेहनगर परिसरातील अब्दालशहा नगर या भागातील रहिवासी आहेत. ही घटना आज बुधवार दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. 

सिल्लोड शहरा लगत रजालवाडी परिसरात औरंगाबाद - जळगांव महामार्गावर डोंगरगाव फाट्याजवळ असलेल्या ( एमटीडीसी ) महाराष्ट्र टुरिझम अँड डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या हॉटेलच्या मागील बाजूस रजालवाडी पाझर तलाव आहे. या तलावात तीन मुले पोहण्यासाठी  गेली होती. मात्र या तिघांचाही या तळ्‍यात बुडून मृत्‍यू झाला.तिघेही एकाच संयुक्त कुटूंबातील आहेत. ही घटना आज बुधवार ,दुपारी तीन वाजण्याच्या सुतारास उघडकीस आली आहे.

तलावात पोहण्यासाठी गेलेल्‍या तिन्ही मुलांची ओळख पटली असून तिघेही सिल्लोड शहरातील स्नेहनगर परिसरातील अब्दालशहा नगर या भागातील रहिवाशी असून, तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झालेल्या या किशोरवयीन मुलांची नावे या प्रमाणे आहेत. सोफियानखान युसुफखान वय (१३ वर्ष), मोहमहखान उमरखान (वय १४ वर्ष) व तालेबखान असिफखान (वय १४ वर्ष) मृत्यू झालेल्‍या तिघांचे प्रेत वैदकीय उत्तर तपासणीसाठी सिल्लोडच्या उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहे. तिघांच्या दुर्दैवी मृत्यूने स्नेहनगर, अब्दालशहा नगर परिसरासह शहरात हळहळ व्यक्‍त करण्यात येत आहे.